महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त!

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. प्रवीण राऊत यांची जवळपास 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती.

या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची 72 कोटींची संपत्ती जप्त केली.

दरम्यान, पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वाधवान ग्रुपचा समावेश असलेल्या 4 हजार 355 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे.

थोडक्यात बातम्या-

“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”

भीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत

अभिनेता सोनू सूदचा कंगणाला अप्रत्यक्षपणे टोला; म्हणाला…

हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा- मोहन भागवत

गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या