बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

मुंबई | सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कालप्रमाणे हे अधिवेशन वादळी होताना दिसतंय. भाजपने विधानसभेच्या बाहेर प्रतिविधानसभा भरवली. भाजपने विधानसभेच्या बाहेर तर महाविकास आघाडीने विधानसेभेत एकमेकांवर आरोप केले जात आहेत. भाजपच्या या प्रतिविधानसभेवर सरकारमधील मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहातील मार्शलांनी ही प्रतिविधानसभा उधळून लागली.

ठरल्याप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू झालं. सुरूवातीला विविध विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात आले. त्यानंतर ही प्रतिसभा उधळून लावण्यात आली. त्यानंतर कालच्या निर्णयामुळे वादात राहिलेले तालिका अध्यक्ष भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्षपदावर बसले. त्यानंतर आंदोलन करत असलेले आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा व्हावी, असे निवेदन थेट अध्यक्षांना देण्याचा प्रयत्न करत होते.

आमदार रवी राणा यांनी दिलेलं निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्या वेळी आपण सहभाग घ्यावा, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. पण हा प्रस्ताव देतानाच त्यांची आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची बाचाबाची झाली. त्यावेळी त्यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढले.

दरम्यान, काही वेळानंतर पुन्हा राजदंड सभागृहात आणण्यात आला. राजदंड पळवण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आलं नाही. त्यानंतर देखील सभागृहाचं कामकाज सुरूच ठेवण्यात आलं होतं. थेट राजदंड पळवल्यानं आता रवी राणा यांच्यावर देखील निलंबणाची कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पत्रकारांवर दंडुकेशाही, विधानसभेत लोकशाहीची हत्या’; विरोधी पक्षनेते आक्रमक

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला”

भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष; प्रतिविधानसभेवर तालिका अध्यक्षांची कारवाई

विधानमंडळ परिसरात भाजपची ‘प्रतिविधानसभा’; कालिदास कोळंबकर प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More