बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

मुंबई | एलआयसी सरल पेन्शन योजना हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे. या योजनत तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील.

एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन. सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल.

पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल. या दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत जिवंत राहील त्याला पेन्शन मिळत राहील. दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला बेस प्राईसचे पैसे मिळतील. तसेच विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल. तसेच  या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.

दरम्यान, जर तुम्ही भविष्याची तरतूद म्हणून एखाद्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एलआयसी सरल पेन्शन योजना ही उत्तम योजना आहे.

थोडक्यात बातम्या- 

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओ

बसल्या बसल्या त्याने चोरी करुन पळणाऱ्या चोराला पकडलं, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांनी बैठक बोलावली

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More