Top News पुणे महाराष्ट्र

महत्त्वाची बातमी! पुण्यातल्या शाळा आजपासून सुरू

पुणे | करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांचा करोना चाचणीचा अहवालही प्राप्त न झाल्याने अनेक शाळा बंद राहणार आहेत. मात्र, पहिल्या दिवशी म्हणजेच आजपासून महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण पुण्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासनाने 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होणार असल्याचं सांगितलं.

शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र, शाळांनी केलेल्या उपाययोजना हा महत्वाचा भाग होता. महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमधून पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम अजून सुरूच आहे.

शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्सिमिटर, वर्गामधील बसण्याची व्यवस्था याचे नियोजन झाले आहे. पण शिक्षकांच्या करोनाच तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या