Top News

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारनच्या गाईडलाईन्सनुसार उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत गाईडलाईन्स जारी केले आहेत. या गाईडलाईन्सनुसार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर आणि हँडवॉश अनिवार्य असेल.

उत्तप प्रदेश सरकारने शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याची घोषणा केली असली तरी त्यासाठी काही अटी-शर्ती देखील जाहीर केल्या आहेत.

शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्के असावी, असं सरकारकडून बजावून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर उर्वरीत विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतील.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”

मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे

‘बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बळकट करा’; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

“गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या