School Timing Rules l पालकवर्ग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात अत्यंत गंभीर असतात. अशातच गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातील शाळा सकाळी 7 वाजता शाळा न भरवता 9 वाजेनंतर शाळा सुरु करावी असे आदेश शासनाने काढले होते. कारण मुलांच्या अपुऱ्या झोपेमुळे सकाळी अभ्यास करण्यात त्यांना उत्सुक्ता वाटत नाही असा अभिप्राय राज्यातील शिक्षण तज्ज्ञांनी प्रशासनातील अधिकारी यांनी दिला होता. मात्र त्यानंतर शाळा सकाळी 9 वाजता भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयानंतरही काही शाळांकडून या नियमांचे पालन होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता शासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचललं आहे.
शासनाने कोणता आदेश काढला? :
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याचा आदेश राज्यातील शाळांना दिले होते. परंतु, राज्यातील काही संस्था चालक शाळा दोन शिफ्टमध्ये भरवतात. त्यामुळे सकाळी सात वाजता शाळा सुरु करतात. मात्र आता त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याचं दिसून आलं आहे. कारण आदेश काढल्यानंतर देखील त्या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे आता शासनाने पुन्हा एक महत्वाचा आदेश काढला आहे.
यावेळी शासनाने पुन्हा एकदा राज्यातील शाळा नऊनंतर भरवण्याचा आदेश काढला आहे. तसेच ज्या शाळा या नियमाचे पालन करणार नाही त्या शाळांवर थेट कारवाई होणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने सर्वच माध्यमांच्या शाळा प्रशासनाला दिला आहे.
School Timing Rules l विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम :
शाळांच्या लवकरच्या वेळेनुसार वर्ग भरवल्यास विद्यार्थ्यांची झोप होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याने विद्यार्थी चिडचिड करतात असे निरीक्षण एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने हा आदेश काढला आहे.
गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी राजभवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी भाषणादरम्यान तत्कालीन राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी शाळांच्या सकाळच्या सत्रातील वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. मात्र त्यानंतर यासंदर्भात चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
News Title – Maharashtra School Timing Rules
महत्त्वाच्या बातम्या-
थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?
‘त्या’ प्रकरणी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा!
आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त