बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

पुणे | कोरोनानं डोकं वर काढलेल्या पुण्यात प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, २८ फेब्रुवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा निर्णय पुन्हा वाढवण्यात आला आहे.

पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. मात्र या काळात ऑनलाईन क्लासेस घेण्यास परवानगी असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे महानगरपालिका हद्दीत संचार बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर, अत्यावश्यक सेवामध्ये कामकाज करणाऱ्यांना मुभा देण्यात येणार आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई चालू राहणार आहे, असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.

काल एकाच दिवशी कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिका अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे. या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सोयीस्कर होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या

संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा

…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

“शासन व समाज मुर्दाड बनलेत, पोलीस कधी नव्हे एवढे लाचार अन् लबाड झालेत”

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More