Top News कोरोना जालना महाराष्ट्र

जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…

Photo Credit - Twitter / @InfoJalna

जालना | जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कोंचिग क्लासेस आणि हाॅस्टेल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह उच्च पदस्त अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा झाली. रुग्णवाढ झालेला बहुतांश भाग हा बुलढाणा जिल्ह्याला लागून आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव शेजारील भोकरदन, जाफराबाद तालुक्यात जाणवू लागला आहे.

मध्यंतरी कोविडच्या केसेस कमी झाल्यामुळे कोविड नियमावलीचे लोकांकडून योग्य प्रमाणात पालन होत नसल्याचे दिसून आले. शासनाने गर्दीचे निकष घालून दिले आहे. मात्र, तेही पाळतांना दिसत नाही. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा आणि हाॅस्टेल 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10 वी आणि 12 वी चे वर्ग वगळण्यात आले असून हे वर्ग चालवितांना कोविड नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सर्व आठवडी बाजार विविध यात्रा 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. राजकीय आंदोलने, मोर्चे, धरणे यावरही बंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहे. व्यापारी, हाॅटेल चालक, भाजी विक्रेते हे सुपरस्प्रेडर असून या सर्वांची तात्काळ रॅपीड अॅन्टीजेन करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

…अन् पुन्हा एकदा भर कार्यक्रमात नेहा कक्करला कोसळलं रडू, सारेच झाले स्तब्ध!

15 मेपासून व्हाॅट्सअप वर मेसेज पाठवता येणार नाही!, जाणून घ्या नविन पाॅलिसीबाबत

आई रागावल्यानं मुलगी घराबाहेर पडली, नराधमांच्या कृत्यानं माणुसकी ओशाळली!

सनी लिओनीमुळे नेटकरी घायाळ, ‘हे’ फोटो पहायला वन मिलियन लोकांच्या उड्या…

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या