Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???

मुंबई  | मुंबईतील नववी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच शाळा, कॉलेजची दारं सुरु होणार आहेत. यासाठीची मुंबई महापालिका विभागाची तयारी पूर्ण झाली असून 18 जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 तारखेला शाळा सुरु होण्याची शक्यता वाढली असल्याचं महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

यासंदर्भातील निर्णय 15 जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्चपासून या शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. अशा शाळाही आता सुरु होण्यास सज्ज झाल्या आहेत.

दरम्यान, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागातर्फे आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार- नितीन राऊत

सीरममधून पहिला कोविशिल्ड साठीचा पुरवठा मुंबईत दाखल!

‘धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा

राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या