‘या’ तारखेपासून पुण्यातील शाळा सुरु होणार, अजित पवारांनी केली मोठी घोषणा
पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हळूहळू पुन्हा शाळा सुरु होणार असून पुण्यातील शाळांबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता, शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 फेब्रुवारीपासून पुण्यात पुन्हा शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून फक्त पुण्यातील शाळांसाठी स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेण्यात आला. पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे, यामध्ये शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दर्शवला आहे. संबंधित नियमावली एका आठवड्यासाठी असणार असून ती पहिली ते आठवीसाठी लागू होणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
काय असेल नियमावली?
शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार
शाळेची वेळ फक्त चार तास
9वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू
8वी पर्यतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार
50 टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार
रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या
थोडक्यात बातम्या –
“…त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत”
“जनाब संजय राऊत फडणवीसांच्या आरोपांमुळे बावचळले आहेत, त्यांचा झिंग झिंग झिंगाट झालाय”
महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; आदित्य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
‘भाजप फ्लॉवर नाही तर फायर आहे’; पुष्पाचा डायलॉग ट्विट करत चित्रा वाघ यांची फटकेबाजी
“खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला बरखास्त करा”
Comments are closed.