बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे’; कोरोनाच्या प्रसाराबाबत तज्ज्ञांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशात चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाबाबत अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, असं नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा अधिक भयंकर असल्याचं चित्र आहे. 15 एप्रिल म्हणजेच गुरुवारी कोरोनानं नवीन उच्चांक गाठला आहे. अजूनही संकट कमी झालेलं नाही. तसेच 25 एप्रिलनंतर कोरोनापासून दिलासा मिळण्यास सुरुवात होईल आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होईल. मे अखेरपर्यंत स्थिती सामान्य होण्यास सुरुवात होईल, असं आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलंय.

सध्याची लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे, कारण यावेळी दररोजचा मृत्यूदर बाधितांच्या प्रमाणानुसार मागील वेळेपेक्षा कमी आहे. लस आल्यानंतर लोकांनी हलगर्जीपण केल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, असं अग्रवाल यांनी सांगितलंय.

गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 1185 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट म्हणजे, 1,18,302 जण कोरोनावर मात करून ठणठणीत बरेही झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण…’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर

“अजित पवार सर्जन आहेत”; पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचे पुन्हा भाष्य

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आले धावून; उचललं हे मोठं पाऊल!

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल- नाना पटोले

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More