बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

omicron हवेतून पसरतोय?; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | omicron या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची डोकेदुखी वाढवली आहे. या नव्या व्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती रोज समोर येत आहे त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. त्यात नव्या व्हेरिएंटचा हवेतून प्रसार होत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात येत आहे.

हॉंगकॉंग येथील एका हॉटेलमध्ये 2 जण क्वारंटाईन होते. या दोघांचेही लसीकरण पूर्ण झाले होते. हॉटेलमध्ये समोर समोर असणाऱ्या खोलीत राहाणाऱ्या या दोघांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा हवेतून प्रसार होत असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या दोन्ही रूग्णांनी त्यांची खोलीही सोडली नाही किंवा एकमेकांशी संपर्कही साधला नाही. फक्त जेवण देणं आणि चाचण्या करणं यापूर्ताच दरवाजा उघडला असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.

दरवाजा उघडल्यानंतर ओमिक्रॉनचा विषाणू हवेतून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेला असल्याचा दावा हॉंगकॉंग विद्यापिठातील संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात केला आहे. ओमिक्रॉनचा (Omicron) हवेतून प्रसार होत असल्याच्या या नव्या दाव्यामुळे ओमिक्रॉनची धास्ती वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ अनाथ मुलाचं पालकत्व शिवसेना स्वीकारणार- किशोरी पेडणेकर

खुशखबर! सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

‘…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाही’; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

“राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर”

अभिनेता इरफान खानच्या मृत्यूविषयी नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More