बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सामना स्कॉटलॅंडने जिंकला पण, 12 वर्षाच्या चिमुकलीची सोशल मीडियावर चर्चा; जाणून घ्या कारण

मुंबई | विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्कॉटलंड संघाने बांग्लादेश संघावर धक्कादायक विजय मिळवला. त्यानंतर पापुआ न्यु गिनी संघावर 17 धावांनी विजय मिळवत विश्वचषकमधील जागा पक्की केली. आता स्कॉटलॅंड संघ भारताशी भिडणार आहे. या धमाकेदार कामगिरीनंतरही स्कॉटलॅंडच्या जर्सीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबत क्रिकेट स्कॉटलॅंड याबाबत ट्विट केलं आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी जर्सी डिझाइन करण्यासाठी स्कॉटलॅंडने देशातील 200 शाळांमध्ये मुलांना सांगितलं होतं. यामध्ये हजारो मुलांनी भाग घेत क्रिकेट स्कॉटलॅंडकडे डिझाईन पाठवले. यामधून 12 वर्षीय रेबेकाने डिझाईन केलेली जर्सी विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आली. यावर काय कमालची किट आहे? रेबेकाने चांगलं काम केलं आहे, असं ट्विट करत आयसीसीने देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे.

जर्सीबद्दल क्रिकेट स्कॉटलॅंडने रेबेका डाऊनीचा फोटो शेअर करत ट्विट केलं होतं. स्कॉटलॅंडची किट डिझाइनर, हॅडिंगचनची 12 वर्षीय रेबेका डाऊनी टीव्हीवर पहिला सामना पाहात होती. तिने स्वत: डिझाइन केलेली जर्सी परिधान केली होती. रेबेका तुझे पुन्हा एकदा धन्यवाद, असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर रेबेकावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तर अनेकांनी तिने केलेल्या डिझाईनचं कौतुक देखील केलं आहे.

दरम्यान, स्कॉटलॅंडने पापुआ न्यु गिनी विरूद्ध 17 धावांनी सामना जिंकून सुपर 12 मध्ये स्थान जवळपास निश्चित केलं आहे. पात्रता फेरीच्या ब गटात स्कॉटलॅंडचा संघ सर्वात वरच्या स्थानी आहे. त्यामुळे त्या संघाच्या खात्यात आता 4 गुणांची भर पडली आहे. तर पुढील सामना ओमानसोबत जिंकून स्कॉटलॅंडचा संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

“काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाप मी निस्तरतोय, काळजी करू नका मी दिलेला शब्द पाळतो”

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! इमारती, रस्ते, पुल उद्धवस्त तर भूस्खलनामुळे 16 जणांचा मृत्यू

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More