लखनऊ | दलितेतर लोकांनी आगामी निवडणुकीत आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करुन निषेध करावा, असे आवाहन भाजप आमदारानं केलं आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही भूमिका घेतली आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणारे विधेयक संसदेत मंजूर झाले अाहे. समाजाची प्रतिष्ठा आणि हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या विरोधात आहे, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, एखाद्या व्यक्तीला चौकशीविनाच तुरुंगात कसे टाकता येईल?,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच या विधेयकाविरोधात मोहिम सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-शांतता प्रस्तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान
-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…
-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!
-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?
-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…