Top News

जेम्स बाँड साकारणाऱ्या या अभिनेत्याचं 90 व्या वर्षी निधन

वॉशिंग्टन | जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शॉन कॉनरी यांचं शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.

स्कॉटिश असलेल्या शॉन कॉनरी यांना ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. शॉन कॉनरी यांच्या निधनानंतर स्कॉटलंडच्या पंतप्रधान निकोला स्टर्गन यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, जेम्स बाँड साकारणाऱ्या नायकांमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय असल्याची बाब नुकतीच एका सर्वेक्षणातून पुढे आली होती.

महत्वाच्या बातम्या-

…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या