महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते

.महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या-