बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी; नवाब मलिक यांनी दिली माहिती

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने काही दिवसांपुर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान डाॅक्टरांकडून करण्यात आलं होतं. 30 मार्चला रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 11 एप्रिलला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 12 मार्चला त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शरद पवार यांना 11 एप्रिलला पुन्हा एकदा ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गॉल ब्लॅडरवर सर्जरी करण्यात आली आहे. शरद पवारांची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

31 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, मंगळवारी पोटदुखीचा त्रास वाढल्यानं ठरलेल्या वेळेआधी शरद पवारांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 30 मार्चला रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 4 दिवस शरद पवारांना रूग्णालयातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. 3 एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सक्तीचा आराम करण्याची सूचना डॉक्टरांनी पवारांना दिली आहे.

दरम्यान, 11 एप्रिलला पुन्हा एकदा शरद पवार यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर गॉल ब्लॅडरवर  सर्जरी झाली आहे. त्याबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही”

मोराच्या फार जवळ जाणं अंगलट, ‘या’ अभिनेत्रीच्या थेट अंगावरच मारली उडी!

“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?”

खेसारीलालच्या नव्या गाण्यानं केला कहर, काही तासात 4 कोटी व्ह्यूज!

असापण फ्रॅाड!; फेसबुक लाईव्ह केलं तर एका झटक्यात 26 हजारावरुन बिलाची रक्कम झाली 6 हजार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More