पुणे | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येतेय. दरम्यान येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.
याचसंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय.
महापौर ट्विटमध्ये म्हणतात, “आगामी काळात कोरोना संसर्ग वाढू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन आपण नजीकच्या भविष्यकाळातील नियोजन केलंय, यंत्रणाही सज्ज आहेत. पण आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे! सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल!”
व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेत.
महत्वाच्या बातम्या-
“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”
योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत
“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”
मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे