बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

नवी दिल्ली | वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सेमीकंडक्टरच्या कमरतेमुळे सध्या देशात अनेक अडचणी येत आहेत. सेमीकंडक्टर हे वाहनांसाठी आवश्यक असलेला भाग आहे. त्यामुळे सध्या या सेमीकंडक्टरची आयात कमी होत असल्याने कार मिळण्यासाठी ग्राहकांना खुप वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आता लोक वाट पाहण्यापेक्षा सेकंड हँड गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहेत.

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कारनिर्मीती 60 टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे आधीच गाड्यांची ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना गाडीची डिलेव्हरी मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागत आहे. सध्या काही ग्राहकांना 12 महिन्यांपर्यंत वेटींग पिरीयड दिला जातोय.

सध्या परिस्थिती अशी आहे की, वाहनांचे बुकींग तर वाढले आहेत. पण कंपन्याकंडे ग्राहकांना द्यायला वाहनच शिल्लक नाहीत. ग्राहकांना वाहनांची डिलेव्हरी येईपर्यंत खूप जास्त वाट पाहावी लागतेय. त्यामुळे आता अनेकजण वाट पाहण्यापेक्षा सेकंड हँड वाहन खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत.

सेमीकंडक्टर हे प्रत्येक इलेक्ट्राॅनिक वाहनांसाठीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सध्या या सेमीकंडक्टरची आयात कमी होत असल्याने  भारताच्या उद्योग क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने हे सेमीकंडक्टर्स दुसऱ्या देशातून आयात करण्याऐवजी भारतातच बनविण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या-

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More