बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस, अमित शहांची गुप्त बैठक, नंतर मोदींशी चर्चा, ठाकरे सरकारवर अस्थिरतेचं ढग?

मुंबई | दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामुळे ठाकरे सरकार कोंडित सापडलंय अशात भाजपने सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. सातत्याने सरकारच्या मंत्र्यांची विविध प्रकरणं उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचारचं प्रकरण उघड झाल्यानंतर, कारवाई करण्याऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे, असं या ठरावात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकी सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातही गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

तर महाराष्ट्रावर विरोधकांचे उपकार होतील- संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; मराठा आरक्षणासाठी सुचवला ‘हा’ उपाय

मोठी बातमी! आळंदीच्या नगराध्यक्षांसह इतके वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा

शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडचं नाव?; कोण असेल भारतीय संघाचा नवा कोच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More