बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांच्या कुटुंबांची सुरक्षा काढून घेताच एकनाथ शिंदे कडाडले

मुंबई | बंडखोर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांची मनधरनी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करुन पाहीले. परंतु आमदार आणि त्यांचे पुढारी एकनाथ शिंदे कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत.

महाविकास आघाडी सरकारने आमदारांच्या परतीसाठी कारवाईचे शस्त्र उगारले. याप्रकरणी 16 आमदारांवर अपात्र ठरविण्याची कारवाई सुरु झाली आहे. तशी पत्रे त्यांना गेली असून 48 तासांत उत्तरे देण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्याच्याही पुढे एक पाऊल टाकत आता मविआ सरकारने या सर्व आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतली आहे.

यावर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.”

दरम्यान, सरकारची चाललेली कारवाई या बंडखोरांंना नमवणार?, त्यांचे बंड फोडून काढणार?, की हे कारवाईचे शस्त्र आणखीन नवीन वादाला तोंड फोडणार हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई, वाचा कारवाईत कोणाकोणाची नावे

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर

उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत केलं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ नॉट रिचेबल

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More