बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! स्वच्छतागृहात तब्बल साडेसहा फुटाचा नागोबा पाहून पोलिसाच्या तोंडचं पळालं पाणी 

नांदेड | नांदेड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग आढळला आहे. शनिवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास स्वच्छतागृहात हा नाग फणा काढून बसलेला आढळल्यानं परिसरात  एकच खळबळ उडाली होती.

या नागाला फणा काढलेलं पाहून पोलिसाच्या तोंडचं पाणी पळालं होतं. रात्री उशीरा सर्पमित्राला बोलावून या साडेसहा फुटी नागाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. वेळीच सतर्क झाल्यानं आणि प्रसंगावधान बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर मात्र परिसरात बराच वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.

नांदेडमधील एनटीसी मिलला लागून नांदेड जिल्हा कारागृह आहे. कारागृह परिसरातच अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची जुन्या पद्धतीची शासकीय निवासस्थाने आहेत. महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात हा विषारी नाग आढळला आहे. रात्री 12:30 च्या सुमारास त्या बाथरूममध्ये गेल्यावर त्यांना, 6 फुटांचा नाग फणा काढून बसलेला दिसला होता.

दरम्यान, स्वच्छतागृहात नाग आढळल्यानंतर पठाण यांनी त्वरित सर्पमित्र भोसले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशीरा नागाला सुरक्षित बाहेर काढलं आहे. त्यानंतर, पठाण कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सर्पमित्र भोसले यांनी सुरक्षित ठिकाणी नागाला सोडून दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“अंगणवाडी सेविका प्रशासनाचा कणा आहेत, तिसरी लाट आली तर तुमची मदत हवी”

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी साधणार संवाद

सकारात्मक बातमी! रविवारी देशात सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More