बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिमुकलीला पाण्यात बुडताना पाहून कुत्र्याने…; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | मुके प्राणी कधीही आपल्या मालकाला विसरत नाहीत. याची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये देखील असंच काहीसं पाहायला मिळतंय. एका चिमुकलीने पाण्यात बुडत असल्याचं नाटक केलं त्यानंतर तिथल्या कुत्र्याने ते पाहिलं तेव्हा तो धावत गेला आणि जीव वाचवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकली समुद्राच्या पाण्यात खेळत आहे. यावेळी तिच्यासोबत एक कुत्रा देखील आहे. हा कुत्रा चिमुकलीचा पाळीव कुत्रा असल्याचा अंदाज आहे. खेळत असताना चिमुकली पाण्यात बुडण्याचं नाटक करते.

मुलीला बुडताना पाहून कुत्रा तिच्या टी-शर्टला पकडतो आणि तिला बाहेर ओढत आणतो. मुलीला बाहेर आणून कुत्रा तिला काटावर ठेवतो. याचा संपुर्ण व्हिडीओ ट्विटरवरील Buitengebieden या अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. त्यात जर प्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की लोकांना प्रचंड पसंतीस येतात. मात्र हा व्हिडीओ काहीसा वेगळा असून प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा कोल्हापूरी चपलेनं लढू नका”

‘येत्या दोन दिवसात…’; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

“सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काडीचाही संबंध नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More