बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

4 वर्षांच्या चिमुरडीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल तिच्या धैर्याला सलाम, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक लहान मुला-मुलींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. आपल्याला माहित आहे की जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

आपण पाहतो जन्मल्यापासूनच काही लहान मुलांना डोळे, पाय, हात नसतात. तर काहींना काही अवयव एखाद्या अपघातामध्ये त्यांना गमवावे लगातात. अशी मुलं ही खूप धाडसी असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी करायची इच्छा असते. अशाच एका धाडसी मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीला एक पाय नसल्याचं दिसून येत आहे. आपल्या कधी-कधी एखादा डोंगर किंवा चढाच्या ठिकाणी चालायचे झाले तरी आपले पाय दुखतात. मात्र या व्हिडीओमध्ये एक पाय नसतानाही ती मुलगी उंच ढिगाऱ्यावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मुलीला एक पाय नसून, तिच्या पायात रॉड घातला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

ती त्या ढिगाऱ्यावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू ढिगारा उंच असल्यामुळे तिला चढण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत आहे. त्रास होत असूनही ती मागे हटली नसून, ती चढण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या या धैर्य आणि चिकाटीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच काहींनी तर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं; सीसीटीव्ही फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More