बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या प्रवासात त्याने अनेक वेगवेगळ्या भूमिका अत्यंत चोखपणे साकारल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीस अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर तो आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

रणवीर भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. भलत्याच रंगाचे कपडे, भलतीच हेअरस्टाइल आणि त्यावर भलत्याच रंगसंगतीचे दागिने असा त्याचा विचित्र लूक याआधीही चाहत्यांनी पाहिला आहे. आता पुन्हा एकदा रणवीर सिंह सोशल मीडियावर त्याच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रणवीरच्या या फॅशनवर विनोदी मीम्ससुद्धा ट्विटरवर व्हायरल होऊ लागले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान, रणवीरने आकाशी रंगचा टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे. त्यावर जॅकेट घातले असून गळ्यात सोन्याच्या चेन घातल्या आहेत.तसेच रणवीरने पिवळ्या रंगाचा चष्मा लावला आहे. रणवीरचा हा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचबरोबर त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

थोडक्यात बातम्या – 

ज्येष्ठ अभिनेता पद्मश्री नसीरुद्दीन शहा यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट!

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

“अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा”; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नयेत- गोपीचंद पडळकर

…म्हणून जिवंत माणसाला तिरडीवर झोपवून वाजत गाजत गावातून अंत्ययात्रा काढली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More