बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पती-पत्नीपेक्षाही त्यांचं नातं गहिरं होतं, शहनाजची स्थिती पाहून मी थरथर कापत होतो”

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने त्याची मैत्रिण अभिनेत्री शहनाज गिलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच बिग बाॅस फेम राहुल महाजनने शहनाजची अवस्था पाहून त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्याने अक्षरश: स्वतःला मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्याने शहनाजची स्थिती देखील सांगितली आहे.

सिद्धार्थच्या जाण्याने शहनाज कोलमडून गेली असून तिला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचं राहुल महाजनने सांगितलं आहे. तिला पाहून असं वाटलं की जसं वादळं यावं आणि सगळं काही धुवून काढवं, अशी तिची स्थिती झाली आहे. जेव्हा ती स्मशानभूमीमध्ये पोहोचली, तेव्हा ती किंचाळू लागली. यावेळी मम्मी मेरा बच्चा, मम्मी मेरा बच्चा, अशी ती ओरडत होती. एवढंच नाहीतर ती सिद्धार्थचे पाय चोळत होती, सिद्धार्थच्या जाण्यावर तिला विश्वास बसत नसल्याचं देखील राहुलने सांगितलं.

सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तिच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर तिची स्थिती पाहून आपण लगेचच बाजूला झालो असल्याचं राहुलने सांगितलं आहे. ती भानावर नव्हती, तिची स्थिती पाहून मी स्वतः थरथर कापत होतो, असं देखील राहुलने म्हटलं आहे. सिद्धार्थ आणि शहनाजचं नातं पती-पत्नीपेक्षाही जास्त गहिरं होतं, अशी प्रतिक्रिया राहुल महाजनने व्यक्त केली आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झालं. त्याच्या मृत्यूने बाॅलिवूड तसेच त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या एका चाहती तरुणीला देखील इतका मोठा धक्का बसला की तरुणी कोमामध्ये गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

वळणाचं पाणी वळणाला गेलं, तालिबानच्या मदतीला पाकिस्तान धावलं, पंजशीरवर पाकिस्तानचा हल्ला!

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?”

‘…त्यालाच तिकीट मिळणार’; राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More