Top News पुणे महाराष्ट्र

पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवार म्हणाले…

Photo Credit- Twitter/ @AjitPawarSpeaks

पुणे | आपल्या बेधडक शैलीमुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत भाष्य केलं आहे. मुंबईत असताना मला काही पोलिस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समजले, असं पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले.

त्याबाबत चौकशी केल्यानंतर समजलं की उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलिस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने पुर्ण करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल पुण्यात अजित पवारांचा अनुकंपा तत्वावरील भरतीचा कार्यक्रम झाला. तेव्हा अजित पवार बोलत होते. एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने असे होणे बरोबर नाही. पोलिसांनी याविषयी दक्षता घेणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी पुणे पोलिसांना सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

अमित शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने बजावले समन्स!

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना- जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद शहरात विना-मास्क ऑटो चालकांवर होणार ‘ही’ कारवाई

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

संतापजनक! शौचासाठी शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या