मुंबई | 15 जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल सोमवारी जाहीर झाले. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं. भाजपच्या या दाव्यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपाची सूज लोकांनी उतरवली असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.
ग्रामपंचायतीचा निकाल हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
तसंच, महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. परंतू त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली असल्याचं शिवसेनं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा
‘काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा’; काँग्रेस खासदाराची मागणी
सिगरेट ओढणाऱ्या आणि शाकाहारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी!
“जगातील नंबर एकचा तोरा मिरवणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली”
‘ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर…’; शिवसेनेचा भाजपला इशारा