बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्राण्याला बघताच वाघाने ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | वाघ हा शिकार करण्यामध्ये तरबेज आहे. वाघाच्या नादी सहसा कोणी लागत नाही. कारण एकदा की वाघाने एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवली, तर त्या प्राण्याना संपवल्याशिवाय तो शांत बसत नाही. त्यामुळे कोणताच प्राणी त्याच्या जवळ जात नाही. जवळ सोडा साधी वाघाची चाहूल जरी लागली, तरी अनेक प्राणी आपली वाट बदलतात. मात्र हत्तीला पाहून वाघाने धूम ठोकल्याचं पहायला मिळालं आहे.

सोशल मीडियावर पशु-पक्षांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका वाघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाघ चक्क हत्तीला पाहून पळून गेल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीमध्ये जंगलात एका सुमसान रस्त्यावर वाघ निवांत बसल्याचं दिसत आहे. मात्र तितक्यातच त्याच्या मागून एक मोठा हत्ती चालत येताना दिसत आहे.

जसा हत्ती पुढे-पुढे येत वाघाच्या जवळ आला. कोणाच्या तरी चालण्याच्या पाऊलांचा आवाज झाल्यामुळे वाघानं मान वळवून मागे पाहिलं, तर हत्ती त्याच्या जवळ येत असल्याचं त्याला समजलं. त्यानंतर कोणताच वेळ न घालवता वाघ तिथून पळून गेला. या व्हिडीओतील वाघाचं भित्रेपण पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

मायावती यांच्यावर केलेल्या अश्लिल वक्तव्यानं रणदीप हुड्डा अडचणीत; पाहा व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी असलेलं हे औषध आता भारतातही वापरणार; आठवड्याभरात रुग्ण होऊ शकतो बरा

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एनसीबीकडून ‘या’ व्यक्तीला अटक

“दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता”

लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून ‘या’ पुरवठादाराची माघार; मुंबई महापालिकेच्या अडचणीत वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More