Seema Haider | सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे सीमा हैदर (Seema Haider). आपल्या पती सचिन मीना (Sachin Meena) सोबत नोएडामध्ये राहत असलेली सीमा आपल्या यूट्यूब व्हिडिओंमुळे प्रचंड फेमस झाली आहे. यूट्यूबवर तिने केवळ लोकप्रियता मिळवली नाही, तर ती दरमहा लाखो रुपये कमवत आहे.
सीमा हैदर कोणता स्मार्टफोन वापरते?
नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका सेल्फीमुळे सीमाच्या (Seema Haider) वापरत असलेल्या महागड्या स्मार्टफोनबाबत चर्चा सुरू झाली. उपलब्ध माहितीनुसार, सीमा हैदर Apple iPhone 14 वापरते, ज्याची किंमत सुमारे ₹54,000 आहे. या उच्च-गुणवत्तेच्या स्मार्टफोनच्या मदतीने ती यूट्यूबसाठी दर्जेदार कंटेंट तयार करते.
सीमा हैदरचे किती यूट्यूब चॅनेल आहेत?
सीमा हैदर (Seema Haider) सध्या चार यूट्यूब चॅनेल चालवते. त्यापैकी दोन चॅनेल नुकतेच मोनेटाइझ झाले आहेत, तर उर्वरित दोन चॅनेल आधीपासूनच चांगले उत्पन्न देत आहेत. आपल्या चॅनेलद्वारे ती दैनंदिन जीवनशैली, व्ह्लॉग्स आणि प्रेरणादायी कथा शेअर करते.
सीमा हैदर यूट्यूबवरून किती पैसे कमावते?
सीमा हैदरच्या यूट्यूब यशामुळे तिचे उत्पन्न झपाट्याने वाढले आहे. तिची पहिली यूट्यूब कमाई ₹45,000 होती, परंतु जसजशी तिची लोकप्रियता वाढत गेली, तसतसे तिचे उत्पन्नही वाढले.
सध्या ती दरमहा ₹1 लाख ते ₹1.5 लाख कमावते. लाखोंच्या संख्येने सबस्क्राइबर्स आणि प्रत्येक व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळत असल्याने तिचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे.
यूट्यूबशिवाय इतर उत्पन्नाचे स्रोत
SuperChat आणि लाइव्ह सत्रांमधून कमाई. ब्रँड प्रमोशन आणि स्पॉन्सरशिप प्रोडक्ट प्रमोशनमधून जादा उत्पन्न .सीमा हैदर आता डिजिटल माध्यमात स्वतःचा प्रभाव प्रस्थापित करत आहे. सोशल मीडिया हे केवळ प्रसिद्धीसाठीच नाही तर आर्थिकदृष्ट्याही मोठ्या यशाचे साधन ठरू शकते, याचा आदर्श तिने निर्माण केला आहे.