नवी दिल्ली | हाथरस प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अप्पर पोलीस महानिर्देशक, कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय.
तुमच्या मुलीबरोबर असं काही झालं असतं आणि अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले असते तर कसं वाटलं असतं, असा प्रश्न न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना विचारल्याचा दावा पीडितेच्या वकील सीमा कुशवाहा यांनी केला आहे.
न्यायाधिशांनी पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबियांकडे घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. न्या. पंकज मित्तल आणि न्या. राजन रॉय यांच्या खंडपीठाने पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा शब्द दिल्याचं सीमा कुशवाहा यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत
मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू
दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर
राज्यात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन