“…तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते”
नवी दिल्ली | भारताचा सलामीचा आक्रमक फलंदाज विरेंद्र सेहवाग नेहमी त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या मिम्समुळे चर्चेत असतो. सेहवाग नेहमी चालू सामन्यात घडणाऱ्या घडामोडीवर मिम्स शेअर करत असतो. आता सेहवाग आणखी एका कारणामुळं चर्चेत आहे. आमच्यावेळी यो-यो टेस्ट असती तर सचिन तेंडूलकर, वीवीएस लक्ष्मण आणि सौरव गांगूली कधीच पास झाले नसते, असं वक्तव्य विरेंद्र सेहवाग याने केलं आहे.
सेहवागने भारतीय संघाच्या निवड प्रकियेवर सडेतोड प्रकिया दिली आहे. “यो-यो टेस्ट पास न झाल्यामुळे कदाचित अश्विन आणि चक्रवर्ती यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळता येत नाहीये. पण मी या गोष्टीला मानत नाही. टीममध्ये खेळाडूंच्या निवडबाबत असेच निकष असते तर सचिन तेंडूलकर, लक्ष्मण आणि गांगूली कधीच पास झाले नसते. मी या तिन्ही खेळाडूंना कधी बीप टेस्ट पास होताना पाहिलं नाही. बीप टेस्ट मध्ये 12.5 गुण मिळवणे आवश्यक होतं. पण सचिन, लक्ष्मण आणि गांगूली 10 किंवा 11 गुण मिळवायचे. मात्र या खेळाडूंकडे स्किल चांगली होती”, असं सेहवाग म्हणाला.
मला वाटतं फिटनेसपेक्षा स्किल जास्त महत्वाचं असतं. जर तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅच हरत असाल तर त्याला काही अर्थ नाही. खेळाडूंमध्ये स्किलची कमी असेल तर ते व्यर्थ आहे. जे चांगले खेळाडू आहेत त्यांना खेळवायलाच हवं. कारण असे खेळाडू कठिण काळात चांगली कामगिरी करू शकतात. या खेळाडूंची फिटनेस देखील चांगली राहू शकते. त्यांची फिटनेस हळूहळू चांगली होऊ शकते, असं सेहवाग एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला.
दरम्यान, सेहवागच्या या वक्तव्याला माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने देखील समर्थन केलं आहे. फिटनेसपेक्षा खेळाडूच्या कौशल्याला महत्व दिलं पाहिजे, असं अजय जडेजा म्हणाला.
थोडक्यात बातम्या-
फेसबुकला मोठा फटका, कंपनीची ‘ही’ सेवा ठप्प झाल्याने यूझर्सचीही मोठी नाराजी
संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकावरून नव्या वादाला सुरूवात
महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
लठ्ठ व्यक्तींना आधी कोरोनाची लस द्यावी की नाही?, जगात सुरु आहे नवा वाद
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.