खेळ

धोनीच्या काळात असं होत नव्हतं; सेहवाग विराट कोहलीवर भडकला

नवी दिल्ली | टीम इंडियात मधल्या फळीत केल्या जाणाऱ्या प्रयोगांवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने विराट कोहलीला चांगलंच सुनावलं आहे.

लोकेश राहुल 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अपयशी ठरला तर सध्याचे टीम मॅनेजमेंट त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करेल. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना असं होत नव्हतं, असं म्हणत सेहवागने विराटला सुनावलं आहे.

महेंद्रसिंग धोनीला चांगलं माहिती होतं की, अशा परिस्थितीत खेळाडूंच्या पाठिशी उभा राहणं किती महत्वाचं असतं. कारण तो स्वत: यातून गेला होता, असंही सेहवाग म्हणाला आहे.

भारताचा लोकेश राहुल टी-20 मध्ये 5 व्या क्रमांकावर जर काही वेळा अयशस्वी ठरला तर भारतीय संघ व्यवस्थापन त्याला या क्रमांकावर ठेवणार नाहीत, असं सेहवाग क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या