बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करतोय’; अमिर खानच्या मुलीने केला मोठा खुलासा

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता अमिर खानची मुलगी सतत सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सतत अनेक पोस्ट शेअर करत असते. तसेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मेंन्टल हेल्थबाबतचे पोस्ट आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. आमिर खानची मुलीने अजून पर्यंत बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तिच्या फॅन्सची संख्या कोणत्या सेलेब्रिटीपेक्षा कमी देखील नाही.

बाॅलिवूडमध्ये पदार्पण न करता सतत चर्चेत येणाऱ्या आमिर खानच्या मुलीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तिने स्वतःचा अनुभव सांगत एक गोष्ट शेअर केली आहे. यादरम्यान कोणी डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण स्वतःची काळजी करतो. मात्र ही काळजी नसून आपण स्वतःचं नुकसान करुन घेत असल्याचं आयराने म्हटलं आहे.

14 जुलै रोजी मानसिक स्थिती तंदुरस्त ठेवण्यासाठी आयराने काही सोपे उपाय सांगितले आहेत. आयराच्या इन्स्टाग्रामवर डिप्रेशन तसेच मानसिक समस्यांवर कशी मात द्यायची याबाबत आयराने पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे आयराच्या मनावर विपरित परिणाम झाले हा अनुभव देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. नैराश्यात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तिने अगास्तु फाऊंडेशन नामक एक स्वयंसेवी संस्था देखील सुरु केली आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती या संस्थेत कार्यरत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

थोडक्यात बातम्या-

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More