बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून?’; संजय राऊत भाजपवर बरसले

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banarjee) यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackrey) यांची भेट घेतली होती. यावरून भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जींसह शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राउत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सर्वप्रथम त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे,’ भाजपचे बेगडी मुंबई प्रेम,’ असं म्हणून पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीनां भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे, मुंबईतला उद्योग पळवायला आल्यात,’ असा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत, ‘आज व्हायब्रंट गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आलेत? मुंबईत त्यांचा रोडशो होत आहे,’ अशी बोचरी टीका करत  त्यांनी शेवटी भाजपला टोला लगावला आहे, ‘आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून?, असा सवाल विचारत त्यांनी मोदी सरकारसह गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, असा सवाल करत आशिष शेलारांनी विरोधकांना चिरडणाऱ्या बंगाली हिसेंचे धडे तर गिरवले जात नाहीत ना?, असा टोला लगावला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मी देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहे- कंगना रनौत

‘…त्यावेळी मात्र या सरकारला लकवा मारतो’; भाजप नेत्याची बोचरी टीका

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More