पणजी | पर्यटनासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील 26 धोकादायक ठिकाणी सेल्फीवर बंदी केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी गोवा सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात समुद्रात पोहणे धोकादायक ठरतं मात्र पर्यटक दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून जीवावर उदार होऊन समुद्रात जातात आणि जीव गमवतात. गेल्या 15 दिवसात 7 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे गोवा सरकारने तातडीने हा निर्णय घेतलाय.
दरम्यान, गोवा सरकारनं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी मरीनची नेमणूक केली आहे. त्यात 105 किलोमीटरच्या किनाऱ्यावर 650 लाईफ गार्ड नेमण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पीक वाटपाची गती वाढवा, मुख्यमंत्र्याचा बँकाना आदेश
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड