बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेल्फी काढायला आलेल्या राखीने चाहत्याला सुनावले खडेबोल, पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क आवश्यकच आहे. मास्क वापरा सुरक्षित राहा असे सगळेच सेलिब्रिटी जनतेला आवाहन करताना दिसत आहेत.

याचदरम्यान, नुकतेच वर्कआऊट करून बाहेर पडलेल्या राखी सावंतला एका चाहत्याने सेल्फी काढण्यासाठी तिला विचारले. विनामास्क बघून राखी संतापली आणि चाहत्याला आधी मास्क लावण्याचे सांगितले. कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मास्क भाईसाहाब पेहले मास्क लगाव , मास्क नाही लगाते तुम जैसे लोगोके कारण मुंबई बंद होगाया है. गलत बात है, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

नुकतेच अक्षय कुमारचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अभिनेता गोविंदालासुद्धा कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल आणि कतरिना कैफलाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या – 

‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला

हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा

‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”

सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठं साम्य; ऑस्टेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचा मोठा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More