नवी दिल्ली | सोने विक्री करताना आता हॉलमार्क शिवाय ते विक्री करता येणार नाही. सरकारने ‘बीआयएस’ नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. येत्या 1 जून 2021 पासून सोन्याच्या शुद्धता तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येणार आहे. नवीन सोन्याचा श्रेणीनुसार 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट असे तीन भाग असतील. तसेच दागिन्यांवर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
हॉलमार्क सोने म्हणजे सोन्याच्या शुद्धतेबद्दलची खात्री आहे. त्यामुळे दागिन्यांवर हॉलमार्क असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. हॉलमार्क करण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘बीआयएस’ सेंटरमध्ये दागिने ठेवून त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यानुसार त्यावर मार्किंग केलं जातं.
15 जानेवारी 2021 ला हॉलमार्किंग करण्याची शेवटची तारीख होती. पण ज्वेलर्स असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार आता ती मुदत वाढवून 1 जून 2021 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता 1 जून पर्यंत सर्व सोने विक्री करणाऱ्या लोकांना मुदतवाढ मिळाली आहे. हॉलमार्किंगची नोंदणी करणे अत्यंत सोप्या पद्धतीचे करण्यात आले आहे.
www.manakonline.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतर सोने विक्री करणारी व्यक्ती ज्या श्रेणीमध्ये येते त्या श्रेणीनुसार शुल्क भरायचे आणि त्यानंतर तो व्यक्ती ‘बीआयएस’चा अधिकृत ज्वेलर्स बनतो. श्रेणी ठरवत असताना ज्यांची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी आहे. अशांसाठी 7 हजार 500 रुपये शुल्क आकारण्यात येत आहेत तसेच 5 कोटी ते 25 कोटी दरम्यान वार्षिक उलाढाल असलेल्या ज्वेलर्सना 15 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. अशाप्रकारे घरबसल्या नोंदणी करून अधिकृत ‘बीआयएस’ ज्वेलर्स बनणे सोपे झाले आहे.
थोडक्यात बातम्या –
कोरोनाचा संसर्ग वाढला, महाराष्ट्र नंतर ‘या’ राज्याने लागू केले कठोर निर्बंध
‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं
राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी
Comments are closed.