बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सेना-भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरीही शरद पवारांनी सरकार बनवलं, हा तर…”

पुणे | मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष प्रकर्षाने समोर आला होता. त्यानंतर सेना आणि भाजपने विधानसभेसाठी पुन्हा हातमिळवणी करत एकत्र निवडणुका लढवल्या. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर अडून बसलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी अनेकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय.

केंद्राकडून सात्त्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातोय. केंद्राकडून सत्तेचा दुरूपयोग केला जातोय, असं शरद पवार म्हणत असतात. सत्तेचा दुरूपयोग हा केंद्राकडून केला जात नाही तर राज्याकडून केला जात आहे. शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं, तरी देखील पवारांनी सरकार बनवलं हा सत्तेचा दुरूपयोग नाही का?, असं सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईवर देखील दानवेंनी भाष्य केलं आहे. केंद्र सरकारमुळे इंधनाच्या किंमती वाढल्या नाहीत, तर त्याचा आंतरराष्ट्रीय दराशी संबंध आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मोदी सरकार अशा प्रकारची इंधनाची दरवाढ करणार नाही, असंही दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कोळसाची टंचाई भासत होती. त्याला देखील राज्य सरकारच जबाबदार आहे. राज्यांनी पावसाळ्यापूर्वी कोळसा उचलला नसल्याने या टंचाईला सामना करावा लागला असता, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी शेअर केला नवा फोटो

“धर्मांतर पूर्णपणे थांबलं पाहिजे, हे RSSचं कायम मत राहिलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More