नवी दिल्ली | अविश्वास ठरावाच्या आधी शिवसेनेनं भाजपचं टेंशन वाढवलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करायचं की विरोधात यावर शिवसेनेनं अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही.
काल शिवसेना प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या नावाने ठरावाला पाठिंबा देणारा व्हीप खासदारांना बजावण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र हा खोडसाळपणा असून असा कोणताच निर्णय झाला नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे संबंध ताणले गेलेले आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील
-दुधाला दर वाढवून मिळावा म्हणून भुकटीला 20 टक्के अनुदान; गडकरींची घोषणा
-सर्वात मोठा कशाला महाराजांचा सर्वात लहान पुतळा उभारा; शिवेंद्रसिंहराजेंची उपहासात्मक टीका
-ये दोस्ती हम नही छोडेंगे; संसदेतील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका
-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी