Top News राजकारण

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच आहे”

मुंबई | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजमीनामा देत राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे भाजपाला एक मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अशात परिस्थितीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आलीये.

एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेच नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाचंही स्वागत केलंय.

अर्जुन खोतकर म्हणाले, पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारं नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा.

तसंच अजून कोणी भाजपा नेता जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आम्ही त्या नेत्याचं स्वागत करू, असंही खोतकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

चेन्नईला ‘सुपर’ धक्का; ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकल्या चपला, व्हिडीयो व्हायरल

दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या