मुंबई | लाेकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. धनंजय जुन्नरकर यांनी या संदर्भात ट्विट केलंय.
मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तेथे रेणुका शहाणे यांनी बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केलं हाेतं, असं धनंजय जुन्नरकर यांनी सांगितलंय.
रेणुका शहाणे यांना विधान परिषदेत पाठवल्यास त्या अजून जोमाने काम करतील आणि गरजूंना न्याय देतील, असं धनंजय जुन्नरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसकडे विधान परिषदेच्या 4 जागा आहेत. आजच्या परिस्थितीत राज्यपाल हे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान यासंदर्भातच विचार करणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा
“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”
“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”
“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”
“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”