बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला डायरेक्ट मेसेज करा, शक्य होईल तेवढी मदत मी करेन- रिया चक्रवर्ती

मुंबई | सध्या राज्यात ऑक्सिजन, बेड्स, कोरोना रुग्णांना लागणारी औषधे या सगळ्यांची कमतरता भासू लागल्याने समाजातले अनेक लोक या गोष्टी उपलब्ध करुन मदतीचा हात पुढे करत आहेत. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील ट्विट करत मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रियाने मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कठीण काळात एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला शक्य त्यांना मदत करा, छोटी मदत किंवा मोठी मदत. मदत ही मदत असते. मी जर कुणाची मदत करू शकत असेल तर मला डायरेक्ट मेजेस करा. मी शक्य ते करेन, असं रिया चक्रवर्तीने म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर रिया चर्चेत आली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर रिया चक्रवर्तीची तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली

दरम्यान, रिया चक्रवर्ती ‘चेहरे’ सिनेमात झळकणार आहे. पण पोस्टरमध्ये कुठेही रियाचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सिनेमात रिया आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडलाय.

थोडक्यात बातम्या- 

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’

सलग 15 व्या दिवशी मुंबईत लोकलला प्रचंड गर्दी; ‘मुंबईकरांनो हे वागणं बरं नव्हं!’

अयोध्या वादावर शाहरूख खाननं सुचवला होता हा तोडगा; शरद बोबडेंच्या निरोप समारंभात मोठा खुलासा

‘फी भरली नाही म्हणून परिक्षेला बसू न दिल्यास…’; शिक्षण विभागाने केलं हे महत्वाचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More