बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बंडखोरांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा..’, महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ममता बॅनर्जींची उडी

कोलकाता | शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता महाराष्ट्रासह देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष आणि नेते यावर आता भाष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याप्रकरणी भाजपवर टीका केली आहे. या बंडाला भाजप कारणीभूत असून त्यांची बंडाला आणि शिंदे गटाला फूस आहे असे पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर आता तृणमुल काॅंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांंनी भाष्य केले आहे. त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या. आम्ही त्यांचा योग्य पाहुणचार घेऊ, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आम्हाला उद्धव ठाकरे आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजप सत्तेत आहे आणि ते पैसा, ताकद आणि गुंडांचा वापर करत आहेत. पण एक दिवस त्यांनाही जायचे आहे. कोणीतरी त्यांचा पक्षही फोडणार आहे. हे चुकीचं आहे. मी या गोष्टीचे समर्थन करत नाही. आसाम ऐवजी त्यांना बंगालला पाठवा, आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करु, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गट महाविकास आघाडीसोबत कोणतीही तडजोड करायला तयार नसून, हे सत्तानाट्य कुठवर चालणार हे पाहाणे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट, वाचा सविस्तर

‘l love Uddhav Thackeray…’; प्रसिद्ध गायक लकी अलींची पोस्ट चर्चेत

शिंदे गटातील आणखी 5 आमदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता!

“सरकार टीकेल किंवा जाईल पण शरद पवारांबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही”

राज्यातील घडामोडींवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More