बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) हे एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी स्पष्ट टीका केली आहे. आता मनसेने देखील कोश्यारी यांना चांगलंच खडसावलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे(Gajanan Kale) आणि संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी अतिशय तीव्र शब्दात टीका केली आहे.

मुंबईतून राजस्थानचे आणि गुजरातचे लोक निघून गेले तर मुंबईत काय उरेल?, असं कोश्यारी हे एका कार्यक्रमात बोलले आहेत. यावर मनसेचे प्रवक्ते यांनी म्हटलं आहे की, हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आली आहे. जर मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या संसकृतीचा अपमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे उगाच चोमडेपणा करू नका, अशा शब्दात त्यांनी कोश्यारींवर संताप व्यक्त केला आहे.

ज्यांना वाटतंकी आर्थिक प्रगती हीच खरी प्रगती आहे, त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळे मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. राज्यातल्या आधीच्या सरकारने जी धोरणं आखली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग, व्यवसायांची प्रगती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत आहे. महाराष्ट्राचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी राज्यपालांवर केली आहे.

आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde) आणि अजून स्पष्ट बोलोले नाहीत. आता ते यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच शिंदे गटातील इतर नेतेही अजून यावर स्पष्ट बोलले नाहीत.

थोडक्यात बातम्या-

‘राज्यपाल कोश्यारींनी राजीनामा द्यावा’, संजय राऊत संतापले

बाळासाहेबांचे दुसरे नातू शिंदे गटात सामील, उद्धव ठाकरेंना मोठा झटका

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख

“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”

‘मला केंद्राची सुरक्षा आहे त्यामुळे…’; ‘त्या’ पत्रावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More