Top News देश

“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”

Photo Courtesy- Pixabay

नवी दिल्ली | आज बहुतेक तरुण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. यामध्ये एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं काही नवीन नाही, मात्र फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती लैंगिक जोडीदाराच्या शोधात आहे, असं एका बलात्कार प्रकरणाचा न्यायनिवाडा करताना न्यायालयानं म्हटलं आहे.

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयानं एका आरोपी युवकाचा युक्तीवाद फेटाळून लावला असून त्याचा जामीन अर्ज देखील फेटाळला आहे. एका मुलीनं आरोपी युवकाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होत, म्हणून तो युवक असं मानत होता, की तिचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे म्हणून तिनं त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवावेत.

उच्च न्यायलयानं अरोपी युवकाचा हा युक्तीवाद नाकारत फेसबुक अकाउंट तयार करण्याचं किमान वय 13 वर्ष असल्याचं निदर्शनास आणून दिलं. तर वय लपवणं हा गुन्हा नसल्याचंही उच्च न्यायलयानं म्हटलं आहे.

दरम्यान, उच्च न्यायलयानं असंही म्हटलं आहे की आरोपीने जेव्हा मुलगी पाहिली असेल तेव्हा ती 18 वर्षांची नसेल हे लक्षात आलंच असेल कारण पीडीतेचं वय केवळ 13 वर्ष होतं. त्यामुळे कोर्टानं आरोपीचा हा बचाव स्वीकारण्यास नकार दिला.

थोडक्यात बातम्या-

जवान पतीला फेसबुकवर ‘आयुष्यभराचं चॅलेंज’ दिलं, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं!

दिलदार पंत! उत्तराखंडामधील पीडितांना केली मोठी मदत जाहीर

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या