Top News पुणे महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई काळाच्या पडद्याआड

पुणे | ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई ऊर्फ ‘आशु’ यांचे काल म्हणजेच बुधवारी 16 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. अभिनेत्री ललिता देसाई यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

ललिता देसाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांनी मागील अर्धशतकापासून हिंदी व मराठी नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी सहअभिनेत्री म्हणून काम केलेले आहे. आचार्य आत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकातील त्यांनी केलेली ‘रश्मी’ ही भूमिका आजही सर्वांच्या आठवणीत आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे.

सन 1984 पासून अभिनेत्री ललिता देसाई यांच्या सोबत असणाऱ्या उमा यांनी ‘आता मी पोरकी झाली आहे’, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती त्रिहान आणि मुलगा बिनोज असा त्यांचा परिवार आहे.

दरम्यान, अभिनेत्रा ललिता देसाई यांच्यावर गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचा मुलगा बिनोज यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या