बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल

मुंबई | दिवंगत अभिनेता दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांना सध्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल केलं असून त्याची प्रकृती ठीक असल्याची समोर येत आहे. सायरा बानोची प्रकृती अचानक खालवल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं होतं.

सायरा बानू यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. या परिस्थितीत डाॅक्टरांनी त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. आता त्यांची प्रकृती जास्त चिंताजनक नसल्याचं डाॅक्टरांनी म्हटलं आहे. आणखी काही दिवस त्यांनी रुग्णालयात थांबावं लागणार आहे.

दिलीप कुमार यांच्या जाण्यानं सायरा बानू कोलमडून गेल्या आहेत. त्या ना कोणाशी जास्त बोलत आहे तर, ना ही कोणाशी भेटत आहेत. दिलीप कुमार यांच्या जाण्यानं त्यांना मोठा धक्का बसला असून त्या हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचं निधन झालं. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा आजारी पडल्याची माहिती समोर आली होती. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी चाहत्यांसाठीही सर्वांत लोकप्रिय आहे. आजही या जोडीवर प्रेम करणारे सायरा बानू यांच्या प्रकृतीची काळजी करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीनच्या चौकशीत धक्कादायक गोष्टींचा खुलासा

“नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची देवाने बनवलेली अप्रतिम जोडी”

‘स्वत:च्या राजकारणासाठी…’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना सल्ला

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली; राष्ट्रपती पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! ‘इतक्या’ शस्त्रधारी जवानांचं राऊतांना संरक्षण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More