भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!

BJP | भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.

मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.

मधुकर पिचड यांचं निधन

मधुकर पिचड यांना सलग सात वेळा विधानसभेवर आमदार म्हणून अकोलेच्या‌ जनतेने निवडून दिलं होतं. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणास सुरूवात झाली होती.

मधुकर पिचड हे 1972 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि अकोले पंचायत समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यांनी 1980 पर्यंत त्या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर ते 1980 मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर 1985, 1990 साली आमदादेखील आमदार म्हणून निवड झाली. मधुकर पिचड यांनी 1991 मध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. 2029 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढील 5 वर्षांचा खुलासा म्हणाले, आता सामना…

“पवित्र ठिकाणी असताना कुठे त्या गटाराचं नाव…”, ‘या’ बड्या नेत्यावर चित्रा वाघ यांची टीका

एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे

शाकाहारी लोकांना Heart attack चा धोका सर्वात कमी?, नवीन संशोधन समोर