शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय!

मुंबई | गेल्या 6 महिन्याच्या सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बरीच चांगली कामं केल्याचं दिसून आलं. तसेच अनेक निर्णयामुळे त्यांना विरोधी पक्षाच्या प्रश्नांना तोंड देखील द्याव लागलं. मात्र आता मिशन 2024 च्या दृष्टिकोनातून शिंदेंनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. एक मोठा गट आपल्याकडं वळवण्यासाठी शिंदेनी एक निर्णय घेतलाय.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आता देवदर्शन मोफत करता येणार आहे. एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन करता येणार आहे. त्यासाठीचा मेगा प्लॅन (Mega Plan) तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या वीकेंडला म्हणजेच शनिवार (Saturday) आणि रविवारी ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येणार आहे. यासाठी शिंदे सरकारने अर्थात महामंडळांने दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे.

तसं पहायला गेल्यास या गोष्टींचा शिंदेना चांगलाच फायदा होणार आहे यात काही शंका नाही याच कारण म्हणजे राज्यात ज्येष्ठ नागरिकांची (Senior citizen) संख्या एक कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा हा गट आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदेनी हा प्लॅन आखला असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेच्या या योजना त्यांना 2024 च्या निवडणुकीत लाभ देतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More